इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. धरण ८६ टक्के भरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून सध्या १५ हजार ८०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी नदी, नाले आणि संभाव्य पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.