येवला शहरातील मिल्लत नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी अनेक मुलांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जखमी मुलांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तसेच भटके कुत्रे पकडून थेट नगरपालिकेत सोडण्याचा इशाराही काही नागरिकांनी व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपला नाशिक जिल्हा
ब्रेकिंग
येवल्यात भटक्या कुत्र्यांचा कहर! अनेक मुलांवर हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#येवला बातम्या
संबंधित बातम्या
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरच्या वाघेरा चौफुलीवर कारवाई; विदेशी मद्याचे ३८ बॉक्स जप्त
आपला नाशिक जिल्हा
नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात! हायवा ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट
आपला नाशिक जिल्हा
येवलेकरांना मोठा दिलासा! १६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
आपला नाशिक जिल्हा
नाशिकच्या ओझर विमानतळावर २५ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक; चार शहरांसाठी थेट सेवा
आपला नाशिक जिल्हा
त्र्यंबकेश्वरमध्ये बिबट्याचा बालकावर हल्ला; चौथीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी


