मागील भागात आपण १६ संस्कार म्हणजे काय आणि त्यांचे जीवनातील महत्त्व जाणून घेतले.
आता सुरू होत आहे प्रत्येक संस्काराचा सविस्तर प्रवास. या भागात जाणून घेऊया पहिला संस्कार – गर्भाधान संस्कार.
भारतीय परंपरेत गर्भाधान संस्काराला नेमके काय महत्त्व आहे आणि या संस्कारामागील विचार काय आहे?
गर्भधारणेपूर्वी योग्य आहार-विहार आणि जीवनशैली याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
निरोगी संततीसाठी भारतीय परंपरा आणि आयुर्वेदामध्ये कोणते मार्गदर्शन करण्यात आले आहे, याचीही माहिती या भागात मिळणार आहे.
गर्भाधान संस्काराचा अर्थ, परंपरेतील महत्त्व आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी पाहा ‘आयुर्वेदावर बोलू काही’चा हा विशेष भाग.


