काँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा आठवा दिवस; राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याबाबत संभ्रम कायम

नाशिकमध्ये काँग्रेसचं १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू असून आज शिबिराचा आठवा दिवस आहे. संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जात आहे.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकला येणार असल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. मात्र, राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत अद्याप अंतिम निर्णय किंवा अधिकृत स्पष्टता समोर आलेली नसल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

राहुल गांधींच्या संभाव्य उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर समारोप कार्यक्रमाच्या तयारीबाबतही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होती. मात्र, दौरा निश्चित नसल्याने समारोपाच्या कार्यक्रमाचं नियोजनही चर्चेचा विषय ठरत आहे.

आता राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याबाबत काँग्रेसकडून अधिकृत घोषणा कधी केली जाते, याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज