मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापताना दिसत आहे.
नाशिकमधील मराठा आंदोलकांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी दिलेल्या आंदोलनाच्या आवाहनाला नाशिकमधून मोठा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका नाशिकमधील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारच्या पुढील निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधील आंदोलकांची नेमकी मागणी काय? २९ ऑगस्टच्या आंदोलनाला किती पाठिंबा मिळणार? पाहा संपूर्ण VIDEO.


