प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उद्या नाशिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये, व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी शांततेत बंदला सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखत बंद पाळावा, असेही सांगण्यात आले.
यावेळी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.


