मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. बन यांच्या वक्तव्याला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मनसे प्रवक्ते आणि पनवेल महानगर क्षेत्राचे मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी नवनाथ बन यांच्यावर जहरी टीका करत राज ठाकरेंवरील टीकेचा समाचार घेतला. चिले यांनी आपल्या वक्तव्यातून भाजपवरही निशाणा साधला.
राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर मनसेकडून करण्यात आलेल्या या पलटवारामुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, योगेश चिले यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


