नाशिकच्या गौळाणे रोड परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आला.
रस्त्यावरून फिरणारा बिबट्या एका नागरिकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा VIDEO परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
बिबट्याच्या दर्शनामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात वनविभागाची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


