नाशिकमधील अडीच हजार कोटी रुपयांच्या डायोसेशन जमीन प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमार्फत संबंधित जमीन व्यवहार, कागदपत्रे आणि प्रकरणाशी निगडित इतर बाबींची चौकशी केली जाणार आहे. अडीच हजार कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळ्यामुळे नाशिकमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू असताना आता राज्य सरकारच्या पातळीवर चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याने पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून संबंधित बाबींचा आढावा घेणार आहे. चौकशीदरम्यान नेमके कोणते तथ्य समोर येतात आणि समितीच्या अहवालातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

या प्रकरणातील चौकशीची पुढील दिशा आणि अधिकृत घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.