नाशिक जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाने परवाना आणि नोंदणी नसलेल्या खाद्य व्यावसायिकांवर धडक कारवाई केली आहे.

देवळाली, दिंडोरी आणि सटाणा परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत १८ खाद्य आस्थापनांकडे FSSAI परवाना नसल्याचे आढळून आले. या कारवाईत तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

देवळालीतील खाऊ गल्ली आणि बस स्टँड परिसरातील १५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच खाद्यपदार्थ न्यूजपेपरमध्ये देणाऱ्या व्यावसायिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा विभागाने सर्व खाद्य व्यावसायिकांना FSSAI परवाना/नोंदणीसह अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.