जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत स्वाइन फ्लूचे तब्बल 46 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात 119 रुग्णांची नोंद झाली होती. नव्या रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांची एकूण संख्या आता 193 वर पोहोचली आहे.

स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांत डेंग्यूचेही आठ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.

हवामानातील बदल आणि साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा इतर गंभीर लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा 

 

आपलं नाशिक | आपला आवाज.