नाशिक : इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर चौफुलीवर वाहतूक बेट नसल्याने अपघातांचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

साईनाथनगर चौफुलीवर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी वाहतूक बेट, झेब्रा क्रॉसिंग तसेच दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या चौफुलीवर वारंवार अपघात घडत असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे या ठिकाणी वाहतूक बेट उभारणे, झेब्रा क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करणे आणि आवश्यक दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.