सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार सुरू असून, आजच्या व्यवहारात दोन्ही धातूंच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीने मोठी तेजी अनुभवली आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील या चढ-उतारामागे अनेक जागतिक घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराचे संकेत, डॉलरची हालचाल, महागाई, भू-राजकीय तणाव आणि जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांचा कल यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत असतो.

जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता निर्माण झाली की सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे मागणी वाढल्यास सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे डॉलर आणि व्याजदरातील बदलांचाही सोन्या-चांदीच्या बाजारावर प्रभाव पडतो.

दरम्यान, सध्याच्या अस्थिर बाजारात आता सोनं-चांदी खरेदी करावी की दर आणखी कमी होण्याची वाट पाहावी? हा प्रश्न ग्राहक आणि गुंतवणूकदारांसमोर आहे. आगामी काळात दर कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याबाबत बाजारातील विविध संकेतांकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खरेदीदारांनी केवळ दरातील एका दिवसाच्या चढ-उतारावर निर्णय न घेता, आपल्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील सध्याची उलथापालथ, त्यामागची कारणं आणि पुढील काळातील संभाव्य दिशा याचा सविस्तर आढावा आपलं नाशिकच्या खास रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.