पितृपक्ष सुरू होताच नाशिकच्या बाजारात नेवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. गवारचा भाव तब्बल १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला असून हिरवी मिरची, पापडी, दोडका-गिलके, वांगी, भेंडी आणि टोमॅटोच्या दरातही वाढ झाली आहे.

पितृपक्षात विशिष्ट भाज्यांना मागणी का वाढते? बाजारातील आवक कमी झाल्याचा दरांवर किती परिणाम होतोय? पावसाचा आणि हवामानाचा भाजीपाल्याच्या बाजारावर काय परिणाम झाला? आणि वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर किती परिणाम होतोय?

गवार १६० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, पापडी ८० रुपये, दोडका-गिलके ६० रुपये, वांगी ६० रुपये आणि टोमॅटो ४० रुपये किलोपर्यंत दर असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या भाजी बाजारातील सध्याच्या दरवाढीची संपूर्ण परिस्थिती जाणून घ्या.

 

आपलं नाशिक | आपला आवाज