विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण तब्बल पंधराव्या दिवशीही सुरू आहे. काल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांची चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासह आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून मैदानावर हे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप वाढला आहे.

चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे. मागण्या पूर्ण होण्यासोबतच अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

राजीनामा घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.