दीपाली पवार मृत्यूप्रकरणात आरोपीच्या बडतर्फीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार भगरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली असून, या प्रकरणात पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

मृत दीपाली पवार यांच्या मुलाचा ताबा आईकडे देण्याबाबत आणि मुलाच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, पुरावे तपासून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.