नाशिक रोड येथील एमएसईबी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून मनसे विद्यार्थी सेनेने आंदोलन केले. कार्यालयातील छायाचित्रावर मनसेने आक्षेप घेत निदर्शने केली. आंदोलनानंतर मोदींचे छायाचित्र हटवण्यात आले. महापुरुषांच्या छायाचित्रांवरून सुरू झालेला हा मुद्दा आता चर्चेत आला आहे.