नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रोख स्वरूपात तत्काळ पेमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीत संगणकीकृत कामकाज, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.