अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेल्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती बंद करण्यात आलेली इंडिगोची नाशिक-दिल्ली सकाळची विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. ही सेवा 1 ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी नाशिकहून सुटणारे हे विमान साडेदहा वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचणार आहे. त्यामुळे व्यावसायिक, शासकीय तसेच इतर कामांसाठी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना त्याच दिवशी आपली कामे पूर्ण करून सायंकाळी नाशिकला परत येणे शक्य होणार आहे.
यापूर्वी इंधन दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे ही सकाळची विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. आता सेवा पुन्हा सुरू होत असल्याने नियमित प्रवासी तसेच व्यावसायिक प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सेवेमुळे नाशिक आणि दिल्लीदरम्यानचा हवाई प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


