नाशिककरांसाठी घरगुती गॅस वापरात सुरक्षिततेसोबतच सुविधेची नवी भर पडली आहे.
भारत गॅसकडून ग्राहकांसाठी ५० टक्के हलका भारत गॅस लाईट सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये या नव्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
पारंपरिक सिलेंडर हाताळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा हलका आणि वापरण्यास अधिक सोयीस्कर पर्याय बाजारात आणण्यात आला आहे.
भारत गॅस लाईट सिलेंडर पारंपरिक सिलेंडरपेक्षा ५० टक्के हलका असल्याने ग्राहकांना तो हाताळणे अधिक सोपे होणार आहे.
या सिलेंडरची अवघ्या चार तासांत घरपोच डिलिव्हरी करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
नाशिक एलपीजी टेरिटरी मॅनेजर महेश एम. आणि आशिष नाहर यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारत गॅसचे अधिकारी, वितरक आणि मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या नव्या सुविधेमुळे नाशिककरांना गॅस वापराचा हलका आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.