सातपूर एमआयडीसी परिसरात सुमारे ५० लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाला आहे. वाशी भरारी पथकाने कारवाई करत वीजमीटरमध्ये रिमोटद्वारे फेरफार केल्याचा प्रकार उघड केला. या माध्यमातून सुमारे दोन लाख युनिट वीज वापरल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी कारखाना मालकाविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाईनंतर सतरा लाख रुपयांची तडजोड रक्कम समोर आली असून, या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.


