वणी-सापुतारा महामार्गावरील पांडाणे पुलावर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात दुचाकीवरील विजय शेखरे आणि रेखा शेखरे हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

धडकेनंतर दुचाकीला आग लागली. आगीत दुचाकी जळून खाक झाली. चारचाकीतील दोघांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.

या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.