पावसाचा जोर काहीसा कमी होताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी कुटुंबीय आणि मित्रांसह इगतपुरीतील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत सुट्टीचा आनंद लुटला.
नगरपरिषद तलाव परिसरातील धबधबा, गोल टेकडी आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. पावसामुळे परिसर अधिक नयनरम्य झाल्याने अनेकांनी येथे छायाचित्रे आणि सेल्फी काढत आठवणी टिपल्या.
पावसानंतर खुललेले निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी विविध भागांतून पर्यटक इगतपुरीकडे दाखल झाल्याचे चित्र दिसून आले. परिसरातील शांत वातावरण आणि हिरवाईमुळे पर्यटकांनी मनमोकळेपणाने वेळ घालवला.
रविवारच्या सुट्टीमुळे दिवसभर पर्यटनस्थळांवर चांगली वर्दळ होती. इगतपुरीचा निसर्गरम्य परिसर पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याचे या गर्दीतून स्पष्ट झाले.


