जळगावच्या चोपडा शहरात तृतीयपंथीयांच्या वतीने दशामाता आगमन सोहळा उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दशामातेचे मुखदर्शन आणि आरती करण्यात आली.
या सोहळ्यात तृतीयपंथीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दशामातेच्या गीतांवर भक्तांनी ठेका धरत उत्साह साजरा केला.
शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
जुना शिरपूर मार्गे मिरवणूक अकुलखेड्यापर्यंत पोहोचली.
फटाक्यांच्या आतषबाजीने दशामातेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.