नाशिक शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.

निखिल कैलास अंभोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि रॉयल एनफिल्ड हंटर ३५० मोटरसायकल असा एकूण २ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता. या कारवाईमुळे शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.