पुणे :  सिया गोयल प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील करण्यात आले असून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर एफडीएच्या पथकाने ही धडक कारवाई केली. तपासादरम्यान संबंधित दुकानाकडे आवश्यक व्यवसाय परवाना नसल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचा माल आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

https://www.aplanashik24.tv/agricultural/vadatun-tomato-shetiche-mothe-nuksan-chandwad-borale

 

कारवाईदरम्यान सुमारे ४ हजार किलो वजनाचा आणि अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची तपासणी करण्यात येत असून त्याबाबतचा पुढील अहवाल प्रतीक्षेत आहे.

या कारवाईमुळे मार्केट यार्ड परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.