आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित तिपके यांची भेट; उपोषणकर्ते राहुल पावरा रुग्णालयात दाखल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित तिपके यांनी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. तिपके आंदोलनस्थळी असतानाच उपोषणकर्ते राहुल पावरा यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर पावरा यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या राहुल पावरा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिजित तिपके यांनी रुग्णालयात जाऊन राहुल पावरा यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
उपोषण सुरू असतानाच आंदोलकाची तब्येत खालावल्याने आंदोलनस्थळी चिंता व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण घडामोडीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
न्यूज डेस्क, आपलं नाशिक
आपलं नाशिक | आपला आवाज


