इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पिंपरी सदो येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने सहा गावांचा इगतपुरी शहराशी संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिंपरी सदो येथील पूल जलमय झाला असून पुलावरून वेगाने पाणी वाहत आहे.
या परिस्थितीमुळे भावली, बोर्ली, पिंपरी, जामुंडा, गवांडा आणि धामाडकीवाडी या गावांतील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इगतपुरी शहराशी असलेला संपर्क तात्पुरता तुटल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कमी होईपर्यंत पाण्याखाली गेलेल्या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नये, तसेच जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


