मध्यवर्ती कारागृहातील बंदींच्या आरोग्य सुविधा आणि मूलभूत सोयी-सुविधांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा घेतला. कारागृहातील बंदींच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी, यासाठी सर्व बंदींची वार्षिक वैद्यकीय तपासणी येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यावेळी कारागृहातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध मूलभूत सुविधा तसेच बंदींसाठी करण्यात येणाऱ्या दैनंदिन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बंदींच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच मध्यवर्ती कारागृहातील स्वयंपाकगृहातील त्रुटी दूर करण्यावरही यावेळी भर देण्यात आला. स्वयंपाकगृहात आवश्यक सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बंदींसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
बंदींची नियमित वैद्यकीय तपासणी, आरोग्य सुविधा आणि मूलभूत सोयी-सुविधांची गुणवत्ता याबाबत प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात कारागृहातील आरोग्य आणि दैनंदिन सुविधांमध्ये कोणत्या सुधारणा केल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


