नाशिक आणि गोदावरी नदीचं नातं केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही... तर या वाहत्या नदीने नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावरही मोठा प्रभाव टाकला आहे. “वाहती नदी म्हणजे त्या शहराचं नशीब चांगलं” असं म्हटलं जातं... आणि नाशिकच्या बाबतीत या म्हणीचा अर्थ आणखी वेगळा जाणवतो. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नाशिकमध्ये वर्षानुवर्षं नदीशी जोडलेली जीवनशैली विकसित झाली. याच वातावरणातून नाशिकमध्ये पोहण्याची संस्कृती कशी रुजली? जुन्या काळात नाशिककर पोहायला कुठे जात होते? गोदावरीच्या प्रवाहाने आणि नदीकाठच्या परिसराने पोहण्याच्या परंपरेला कसं बळ दिलं? आणि या संस्कृतीशी नाशिकच्या जुन्या पिढीच्या आठवणी कशा जोडल्या आहेत? यासोबतच गाडगे महाराज पूल, अहिल्याराज पूल, व्हिक्टोरिया पूल आणि होलकर पूल यांचा गोदावरीशी असलेला संबंध आणि नदीच्या पुराच्या जुन्या आठवणीही या भागात जाणून घेणार आहोत. ‘गप्पा नाशिकच्या’च्या या विशेष भागात गोदावरी, नाशिकचे पूल आणि नाशिकची पोहण्याची संस्कृती यांचा एक वेगळा ऐतिहासिक प्रवास पाहा. 🎙️ गप्पा नाशिकच्या 👤 विशेष संवाद : डॉ. प्रमोद 🌊 विषय : गोदावरी, नाशिकचे पूल आणि पोहण्याची संस्कृती नाशिकच्या इतिहासाशी आणि जुन्या आठवणींशी जोडलेला हा विशेष भाग नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर Like | Comment | Share | Subscribe नक्की करा. आपलं नाशिक | आपला आवाज #GappaNashikchya #Godavari #NashikHistory #NashikSwimming #AplaNashik