नाशिकची जीवनवाहिनी… गोदावरी! या गोदावरीचं पावित्र्य जपण्यासाठी, तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अनेक हात आज कार्यरत आहेत. गोदावरीचं नैसर्गिक साधनसंपत्ती जपत, नदीचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी धडपडणारे असेच एक व्यक्तिमत्त्व आज आपल्या सोबत आहेत. गोदावरीसाठीचा त्यांचा संघर्ष, नदीच्या संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि भविष्यात गोदावरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय करता येऊ शकतं, याविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आजच्या ‘गप्पा नाशिकच्या’ या विशेष भागात आपल्यासोबत आहेत — राजेश पंडित! चला, जाणून घेऊया गोदावरीच्या संवर्धनासाठीचा त्यांचा प्रवास… त्यांचे अनुभव आणि गोदावरीच्या भवितव्याबाबत त्यांची भूमिका!