येवला येथे राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींपासून नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपर्यंत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

ईबीसी, ओबीसी, मराठा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देताना समान निकष लागू असावेत, अशी भूमिका भुजबळांनी मांडली. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

 

नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेवर आणि मनोज जरांगे यांच्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.