चांदवड : तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आणि उडीद यांसह विविध पिकांची पेरणी केली होती.

 

मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. विशेषतः शिंगवे परिसरात शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र दिसत आहे.

 

https://youtu.be/dC5l4BhotQo?si=RNcp3CBWoXZLRx87

 

शेतकऱ्यांनी आता दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली असून, लवकरच पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागून राहिले आहे.