नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी रविकांत तुपकर यांनी सरकारकडे कुटुंबाला ५० लाखांची मदत आणि पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. हा मृत्यू नियोजित खून असल्याचा आरोप करत त्यांनी कुबेरफळ पतसंस्थेच्या व्यवहारांची चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.