अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शेखर भोयर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शिक्षक मतदारसंघाला आता रामराम करत शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१८ वर्षे शिक्षकांसाठी काम करूनही शिक्षकांनी कामापेक्षा पैशाला महत्त्व दिल्याचा आरोप भोयर यांनी केला. निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढे आपले कार्यालय २४ तास सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.