बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळावे आणि तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, या मागण्यांसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली शेलूबाजारच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चात हजारो शिवसैनिक सहभागी झाले असून, समृद्धी महामार्गाच्या दिशेने आंदोलनासाठी कूच करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले तरी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी माघार घेणार नाही, अशी भूमिका आमदार सिद्धार्थ खरात यांनी मांडली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि योग्य अनुदान मिळावे, अशी मागणी पक्षाकडून करण्यात येत आहे.