नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या विधानावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात निलंबनाचा प्रस्ताव आणावा, असेही ते म्हणाले.

यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर डेटा सेंटरच्या पाणीवापरावर प्रश्न उपस्थित केले. शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी, जंगलतोड रोखणे आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली.