खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर; तरीही शेतकऱ्यांसमोर चिंता का? 🌾
राज्यात खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सरासरी क्षेत्राच्या तब्बल ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, या आकडेवारीमागे शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर कमी पेरणी झाली आहे.
यंदा सर्वाधिक फटका मक्याच्या पेरणी क्षेत्राला बसला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड लाख हेक्टरने घट झाली आहे. त्याचबरोबर कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रातही मोठी घट दिसून येत आहे. मुगाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या केवळ ४२ टक्के, तर उडदाची पेरणी ५५ टक्क्यांपर्यंत झाली आहे.
मग राज्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर पोहोचूनही परिस्थिती पूर्णपणे समाधानकारक का मानली जात नाही? कोणत्या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आणि कोणत्या पिकांच्या क्षेत्रात घट झाली? पेरणी क्षेत्रातील या बदलाचा आगामी उत्पादन, बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होऊ शकतो?
खरीप पेरणीच्या आकडेवारीमागचं संपूर्ण चित्र आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा संभाव्य परिणाम जाणून घ्या ‘आपलं नाशिक’च्या खास Explainerमध्ये.
📰 आपलं नाशिक | आपला आवाज


