नाशिक शहराभोवती जवळपास 66 किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाहतूक कोंडी कमी करणे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
मात्र रिंग रोडच्या वाटेत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, द्राक्षबागा, विहिरी आणि फळझाडे येत असल्याने भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सारूळ, राजूरबहुला, पिंपळगाव बहुला, बेलगाव धगा, आंबेबहुला, गौलाणे आणि पाथर्डी यांसह विविध भागांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
Section 11, Section 19 आणि Section 21 अंतर्गत अधिसूचनांपासून शेतकऱ्यांच्या आक्षेपांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रिंग रोडचा नेमका मार्ग कसा ठरला, Alignment कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आले आणि शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
या विकास प्रकल्पामुळे शेतजमीन, बागायती आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर काय परिणाम होणार, याचा आढावा ‘आपलं नाशिक’च्या या विशेष रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.