नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये वाढलेल्या नाराजीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. नाशिकमध्ये आयोजित भक्तिसंगम महोत्सवाच्या सोहळ्यातून मुख्यमंत्र्यांनी शहरातील खड्डे, सुरू असलेली विकासकामे आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत भाष्य केले.

नाशिक शहरात एकाचवेळी अनेक विकासकामे सुरू असल्यामुळे नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. मात्र, शहरातील सुरू असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, विकासकामांवरून नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचा संदर्भ देताना मुख्यमंत्र्यांनी, “मंत्र्यांवर नाशिककर संतापले, उद्या तेच हार हार घालतील”, असे वक्तव्य केले. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती सकारात्मक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या जागेचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले.

नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ते सुरू असलेल्या विकासकामांपर्यंत आणि आगामी कुंभमेळ्यासाठीच्या साधुग्रामच्या नियोजनापर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलं? संपूर्ण बातमी पाहा.