नाशिक : नाशिक रिंग रोड आणि हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.
रिंग रोड आणि हायवे क्रमांक २९च्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी, भूसंपादन प्रक्रिया आणि संबंधित मागण्यांवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि योग्य तोडगा काढावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकरी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. जोपर्यंत संबंधित प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे.
नाशिक रिंग रोड आणि हायवे क्रमांक २९च्या प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांचा नेमका प्रश्न काय आहे? त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जाणार का आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार, याकडे आता लक्ष लागले आहे.


