नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अनियंत्रित खोदकाम आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पुढील आठवड्यात विशेष महासभा होणार आहे. या महासभेत जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई, अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दुरुस्तीवर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पावसामुळे उघड झालेली रस्त्यांची दुरवस्था, भूमिगत कामांमुळे निर्माण झालेल्या समस्या आणि कुंभमेळा विकासकामांमुळे नागरिकांमध्ये वाढलेला संताप या सर्व मुद्द्यांवर महासभेत सविस्तर चर्चा होणार आहे.