पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात व्यक्तींनी कुलूप तोडून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेचे कुलूप तोडल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी शाळेतील विजेच्या वायरी तोडल्या असून, भिंतीचेही नुकसान करण्यात आले आहे.

 

 

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे