वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा आरोप एका ४५ वर्षीय किराणा व्यावसायिकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रफुल्ल साखरकर याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप आहे. ओळखीचा फायदा घेत ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. या घटनांमुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात गर्भपात घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यासंदर्भातही पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाशिमच्या अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांनी या प्रकरणासंदर्भात माहिती दिली आहे.

अल्पवयीन मुलीशी संबंधित या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.