इगतपुरी तालुक्यातील मुरंबी-भंबाळे फाटा परिसरात भर पावसात बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळाला. एका शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्या दिवसाढवळ्या फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

बिबट्या घरासमोर दिसताच कुटुंबीयांनी लहान मुलांसह घरात सुरक्षित आश्रय घेतला. यावेळी घरातील कुत्रा बिबट्याच्या दिशेने धावल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

परिसरात वारंवार बिबट्याचा वावर होत असल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.