त्र्यंबक नगरीत पावसाची उघडीप आणि निसर्गरम्य वातावरणात ‘बम बम भोले’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं. त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचा कुशावर्त तीर्थावर सात-आठ-एक पालखी सोहळा पार पडला. यावेळी विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

गर्दी आणि वाहतुकीच्या नियोजनाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थेट एसटी बसने प्रवास केला. यावेळी त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतूक व्यवस्था, भाविकांची गर्दी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी करण्यात आली. पावसाळी वातावरणात पार पडलेल्या या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण त्र्यंबक नगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं.