मालेगाव महापालिकेतील टिपू सुलतान फोटो वादाला नवं वळण; प्रशासनाने फोटो हटवला
उपशीर्षक: फोटो हटवल्यानंतर आंदोलकांना लेखी माहिती; हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू असलेल्या वादाला अखेर नवं वळण मिळालं आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित फोटो दालनातून हटवला असून, याबाबत आंदोलकांना लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली आहे.
फोटो हटवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केलेलं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं आहे. महापालिका कार्यालयांमध्ये महापुरुषांचे फोटो लावण्यासंदर्भातील शासन निर्णयाचा आधार घेऊन संबंधित फोटो लावण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने फोटो हटवल्याने आंदोलनाची तीव्रता कमी झाली असली तरी उपमहापौर शान-ए-हिंद यांचं दालन अद्याप बंद असल्याने पुढील घडामोडींबाबत उत्सुकता कायम आहे.
दालन बंद ठेवण्यामागील नेमकं कारण काय, तसेच दोन दिवसांनंतर दालन उघडल्यानंतर त्याठिकाणी काय परिस्थिती निर्माण होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फोटोच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादात प्रशासनाची भूमिका, आंदोलकांची मागणी आणि पुढील निर्णय यामुळे मालेगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


