नाशिकच्या अशोका मार्गावरील कल्पतरू नगर परिसरात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.
काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेत किती आर्थिक नुकसान झाले, याचाही अंदाज अद्याप समोर आलेला नाही.


