दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या पोस्टरचा निषेध नोंदवला.

यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभाव्य संघर्ष टळला.

आंदोलनावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.