देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्याजवळ गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला.

विंचूर–प्रकाशा महामार्गावर पुणे–सटाणा ST बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही बसच्या चाकाखाली आले.

या भीषण अपघातात अंबादास कुंवर, मोहन वाघ आणि भरत पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, तिघेही भऊर येथे कामासाठी जात होते.

अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेनंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची नेमकी कारणे आणि घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.

रामेश्वर फाट्याजवळ नेमका कसा झाला हा भीषण अपघात? तिघांच्या मृत्यूची धक्कादायक घटना पाहा VIDEO.